मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना पहिल्या दिवसापासून सांगतोय राजकीय टीका करु नका. आंदोलन कुठेही भरकटता कामा नये, अशीच आमची इच्छा आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली, तेव्हा सभा उधळून लावण्याची भाषा केली गेली. तेव्हा नारायण राणे यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिले आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पीएम मोदींवर भाष्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता नितेश राणेही मैदानात उतरले आहेत. राजकीय टीका करु नका, असे आवाहन नितेश राणे यांनी दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबियांनी मराठा समाजासाठी काय केलं? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. समाजासाठी काही करु शकलो तर ते आम्ही आमचे कर्तव्य मानतो. मराठा स्वतःच्या हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे. यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्हीही संघर्ष केलाय. फक्त पहिल्या दिवसापासून मी जरागेंना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करु नका, असे आवाहन नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना केले आहे.
आपण जबाबदारीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यावर घेऊन गेलेलो आहोत. काही दिवसात मराठा समाजाला स्वतःचं हक्काचे आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. समाज बांधव म्हणून जरांगे यांना आणि सहकार्यांना सांगेन आपल्यात एकजूट कायम ठेवण्याच काम केले पाहिजे. राणे कुटूंब म्हणून आम्ही आजही समाजासोबत आहोत आणि कायम राहू, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…