मुंबई: भारत(india vs england) आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरूवारपासून खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारताने ५ विकेट गमावत ३२६ धावा केल्या. या दरम्यान २ शतके आणि एक अर्धशतक ठोकले गेले.
कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शतकी खेळी केली तर रवींद्र जडेजा १०० धावांवर नाबाद आहे. जडेजा आता दुसऱ्या दिवशीही मैदानात उतरणार. तर सरफराज खानने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत ६६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यात त्याने १ षटकार आणि ९ चौकार लगावले.
मात्र सर्फराजला शतक ठोकता आले नाही आणि तो रनआऊट झाला. जडेजा ९९ धावांवर खेळत होता. त्याने शॉट लगावत एका धावेसाठी हाक दिली. मात्र फिल्डरच्या हातात बॉल जाताना पाहून त्याने धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत सर्फराज खूप पुढे आला होता आणि तो रनआऊट झाला.
यासाठी आता जडेजाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्फराजची माफीही मागितली. जड्डू म्हणाला ही त्याचीच चूक होती. जडेजाने माफी मागताना लिहिले, सर्फराजसाठी खूप वाईट वाटत आहे.तो माझा चुकीचा कॉल होता. सर्फराज खूप चांगला खेळला.
सर्फराज रनआऊट झाल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये रोहितही भडकला होता. त्याने आपल्या टोपी काढून जमिनीवर आपटली.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…