IND vs ENG: जडेजा, रोहितचे दमदार शतक, सर्फराजचे अर्धशतक, भारत पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६

राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा केल्या. रवींद्र जडेजाचे नाबाद शतक, कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि सर्फराज खानचे पदार्पणातील अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला.


पहिल्या दिवसाच्या सुरूवातीलाच ३ बाद ३३ अशी अवस्था असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. तब्बल २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीतील शतक ठोकले.


रोहितने १९६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १३१ धावा तडकावल्या. रोहितने या सामन्यात षटकार ठोकण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.


त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. रवींद्र जडेजाने दिवसअखेर नाबाद ११० धावा केल्यात. या खेळीत जडेजाने आतापर्यंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकलेत. यासोबतच सर्फराज खाननेही या पदार्पणाच्या सामन्यात ६२ धावांची तुफानी खेळी केली.


सर्फराज खानने ६६ बॉलमध्ये ९चौकार आणि १ षटकार लगावताना ६२ धावा ठोकल्या. त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ५ बाद ३२६ धावांवर खेळत होता.


इंग्लंडकडून मार्कवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर टॉम हार्टलेला एक बळी मिळवता आला. जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांना एकही बळी मिळवण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली