Yami Gautam : यामी गौतमकडे गुडन्यूज! पती आदित्यने दिली माहिती

यामी-आदित्य लवकरच होणार आईबाबा


मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम (Yami Gautam). तिने केलेल्या चित्रपटांपेक्षा तिच्या ब्युटी प्रोडक्टसच्या जाहिरातींमुळे (Beauty products ads) ती विशेष प्रसिद्ध आहे. यामीचा नवा 'आर्टिकल ३७०' (Article 370) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काल ट्रेलर लाँच (Trailer launch) सोहळा पार पडला. या सोहळ्यात यामीचा पती आदित्य धरने (Aditya Dhar) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. यामी आणि आदित्य लवकरच आईबाबा होणार असल्याची त्याने घोषणा केली.


आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान यामी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. या सोहळ्यावेळी आदित्य म्हणाला, यामी आई होणार आहे, लवकरच आमच्या घरी बाळ येणार आहे. आदित्यने ही गुडन्यूज दिल्यानंतर यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामी आणि आदित्य यांच्यावर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदित्यने दिग्दर्शित केलेल्या उरी या चित्रपटात यामीने काम केलं. यामी गौतमने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या विक्की डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामी गौतमचा ओएमजी २ हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला.


Comments
Add Comment

मुंबई मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद, एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : चेंबूर–जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया