Thackeray Group : ठाकरेंना मोठा धक्का देत 'हा' निष्ठावंत नेता मुख्यमंत्री शिंदेंच्या वाटेवर?

  799

निवडणुकांवेळी ठाकरे गटाला मिळणार आणखी एक झटका


मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तयारीत सर्व राजकीय पक्ष (Political parties) गुंतलेले असतानाच महाविकास आघाडीवर (MVA) मात्र ऐन निवडणुकांच्या वेळी पक्ष सोडून चाललेल्या आपल्या नेत्यांची चिंता करावी लागत आहे. राष्ट्रवादी (NCP) अजित पवारांची (Ajit Pawar) झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा झटका मिळाला. यानंतर आता ठाकरे गटाला (Thackeray Group) एक मोठा धक्का पचवावा लागणार असल्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार, अत्यंत निष्ठावान नेते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय रवींद्र वायकर (Ravindra Waikar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कास धरणार आहेत. हा मोठा मासा शिंदेंच्या गळाला लागल्याने ठाकरे गट आणखी कमकुवत होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते. तसेच वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.


जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात वायकरांना ईडीने समन्स बजावल्यानंतर २९ जानेवारी रोजी तब्बल ९ तास त्यांची ईडीने चौकशी केली. त्यांना ईडी चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आलं होतं. दोनदा प्रकृतीचं कारण देत त्यांनी चौकशी टाळली होती. ही चौकशी राजकीय दबावापोटी असल्याचा आरोप त्यांनी तेव्हा केला होता.



कोण आहेत रवींद्र वायकर?


जोगेश्वरी भागातून १९९२ मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. २००६-२०१० या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर २०१९च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.


Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम