लॅण्ड जिहाद, लव जिहाद मुक्त मुंबई होण्यासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

  280

मुंबई : सकल हिंदू समाज आयोजित उद्या शनिवारी (दि. १० फेब्रुवारी) रोजी मानखुर्द, गोवंडी, चेंबूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘लॅण्ड जिहाद’लव जिहाद वक्फ बोर्ड रद्द व्हावा यासाठी चेंबूर येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


‘अब फिर एक बार हिंदुओकी हुंकार’ची घोषणा घेऊन शनिवारी सायंकाळी ४ वाजता एम ईस्ट महानगर पालिका देवनार गोवंडी पासून मोर्चाची सुरुवात होणार असून PMGP कॉलनी येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मुंबई सह चेंबूर भागात अवैद्य प्रार्थनास्थळे, भूमी जिहाद आदी विरोधात हा मोर्चा असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.


या संदर्भात पोलीस विभागातर्फे देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि सदर मोर्चात प्रमुख वक्ते म्हणून हिंदुत्वादी आमदार नितेश राणे, हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.


तसेच मानखुर्द अनुशक्तिनगर, गोवंडी, चेंबूर मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तसेच धार्मिकस्थळे, हिंदूंवर होणारे हल्ले तसेच ह्या भागात बांगलादेशी मुस्लिम यांची वाढलेली संख्या, वाढत असलेली वस्ती व काही अधिकारी यांना मदत करत आहे यांचा देखील या संदर्भात देखील वक्त्यांकडून समाचार घेतला जाणार असल्याचे बोलले जाते आहे. तसेच मिळालेल्या माहिती नुसार शहरात जिल्ह्यात बैठकीचे आयोजन, शहरात वस्ती, पाढे, कॉलनी येथे निरोप देणे हे सूक्ष्म पद्धतीने नियोजन चालू असल्याचे बोलले जाते आहे. सदर मोर्चात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर