Sunday, September 14, 2025

Team india: आज होणार भारतीय संघाची घोषणा! विराट कोहली घेऊ शकतो ब्रेक

Team india: आज होणार भारतीय संघाची घोषणा! विराट कोहली घेऊ शकतो ब्रेक
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर येत आहे. वाईट बातमी अशी की भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतून बाहेर असू शकतो. मात्र यातच एक चांगली बातमी समोर येत आहे. ही बातमी दुखापतग्रस्त स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलबाबत आहे. खरंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. सुरूवातीच्या दोन सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे.

तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतात राहुल-जडेजा

शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे. जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नव्हते. मात्र आता रिपोर्टनुसार या दोन्ही स्टार खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकते. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यावेळेस बंगळुरू स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. दोघेही बीसीसीआयच्या निगराणीखाली आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतो. त्याला विशाखापट्टणम कसोटीत आराम देण्यात आला होता.

सिराजला प्लेईंग ११मध्ये मिळू शकते संधी

सिराजला पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग ११मध्ये सामील करण्यात आले होते मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. सिराजला त्या सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत सिराजच्या जागी मुकेश कुमारला संधी दिली होती. मात्र त्यालाही विकेट घेता आल्या नव्हत्या.  
Comments
Add Comment