चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९नंतर भरवा, राज्य सरकारचे आदेश

मुंबई: राज्यात इयत्ता चौथी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवा असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याबाबतचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. याबाबतच्या सूचना सरकारकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.


मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुलांच्या झोपेबाबत चिंता व्यक्त करत शाळांच्या वेळा बदलण्यात यावा असे राज्यपालांनी सूचना दिल्या होत्या.


शालेय शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत विचारविनिमय सुरू होता. मात्र आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी प्राथमिक शाळा सकाळी ७ वाजता सुरू होत असता. मात्र यामुळे लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होत होता. मुलांची नीट झोप न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.


राज्यात विनाअनुदानित, अनुदानित, सरकारी आणि खाजगी अशा मिळून एकूण १,१०,११४ शाळा आहे. दरम्यान, सरकारने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील ६५ हजाराहून अधिक शाळांमध्ये होऊ शकते.


Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा