८ जीबी रॅम, 6000mAh बॅटरी, ५०MP बॅक कॅमेरा आणि किंमत १० हजाराहूनही कमी

मुंबई: अमेरिकेच्या स्मार्टफोन कंपनी मोटोरोलाने(Motorola) गेल्या काही महिन्यांत अनेक बजेट स्मार्टफोन लाँच केले. या कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये अनेक स्मार्टफोन्स लाँच केले. त्यातील एक स्मार्टफोनचा फर्स्ट सेल म्हणजेच पहिली विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या फोनचे नाव मोटो जी२४ पॉवर आहे. या फोनमध्ये अनेक चांगले स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत.या फोनची किंमतही १० हजाराहून कमी आहे.


Moto G24 Power या फोनचे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. या फोनचा पहिला व्हेरिएंट ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजवाला आहे. याची किंमत ८९९९ रूपये आहे. या फोनचा दुसरा व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असा आहे. याची किंमत ९,९९९ रूपये इतकी आहे. या फोनची विक्री ७ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली
आहे.


या फोनमध्ये कंपनीने ६.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९०HZ इतका आहे. या फोनमध्ये प्रोसेसरसाठी MediaTek Helio G85 चा वापर करण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित ओएस MyUX वर चालतो.


या फोनच्या मागच्या भागात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे तर २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर्स आणि एक एलईडी फ्लॅशही आहे. फोनच्या पुढील भागात १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.


या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इतकी मोठी बॅटरी असल्याने एक गोष्ट तर निश्चित आहे की एकदा हा फोन चार्ज केल्यानंतर बराच काळ चार्जिंग राहू शकते. याशिवाय चार्जिंग संपल्यानंतर 30W च्या फास्ट चार्जरसोबत ते आपला फोन फटाफट चार्जही करू शकतात.

Comments
Add Comment

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते