भोपाळ: मध्य प्रदेशच्या हरदा फटाका कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी तीन जणांना अटक कऱण्यात आली आहे. मुख्य आरोपीलाही अटक कऱण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक खान यांचा समावेश आहे. राजेश अग्रवालला राजगढ जिल्ह्याच्या सारंगपूर येथून अटक करण्यात आली. तर कारमध्ये बसून दिल्लीला फरार होण्याच्या प्रयत्नात होते. हरदा कंपनीत झालेल्या स्फोटात तब्बल ११ लोक मारले गेले तर १७५ जण जखमी झाले.
हरदा अवैध फटाका कंपनीचे संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथून अटक करण्यात आली. आरोपी घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत होते. राजेश अग्रवाल उज्जैन येथून दिल्लीला निघाले होते. सोबतच सोमेश अग्रवाल होते. ते मध्य प्रदेश सोडून दिल्लीला जात होते.
अटकेनंतर आरोपीलांना हरदाला पाठवले
सारंगपूर एसडीओपी अरविंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश-उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या नॅशनल हायवेवर सारंगपूर पोलिसांनी रात्री ९ वाजता राजीव अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफीक यांना अटक केली. कागदोपत्री कारवाईसाठी आरोपींना हरदाला पाठवण्यात आले आहे. हरदा स्फोटाप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४, ३०८, ३४ तसेच कलम ३ स्फोट अधिनियमाच्या अंतर्गत तीन आरोपींना अटक केली.