Monday, July 22, 2024
Homeक्रीडाIND vs SA: फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला हव्यात २४५ धावा

IND vs SA: फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला हव्यात २४५ धावा

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकप २०२३मधील पहिला सेमीफायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना आफ्रिकेने ५० षटकांत २४४ धावा केल्या आहेत. संघासाठी लुईन ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. या दरम्यान भारतासाठी राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

बेनोनीने विलोमूर पार्कमध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेसाठी पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. भारतासाठी हा निर्णय योग्य ठरला कारण त्यांनी आफ्रिकेला २५० धावांच्या आत रोखले. भारताने लवकर विकेट घेत आफ्रिकेला मोठा स्कोर करण्याची संधी दिली नाही. दरम्यान, नवव्या स्थानावर उतरलेल्या ट्रिस्टन लुसने १२ बॉलमध्ये नाबाद २३ धावांची महत्त्वाची खेळी केली. यात त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले.

आफ्रिकेची सुरूवात काही आव्हानात्मक ठरली नाही. त्यांनी ५व्या षटकांत २३ धावांवर पहिला विकेट गमावला. आफ्रिकेला पहिला झटका स्टीव्ह स्टोल्कच्या रूपात बसला. त्याने १७ बॉलमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. त्यानंतर ९व्या ओव्हरमध्ये संघाने दुसरा विकेट डेविड टीगरच्या रूपात गमावला.

लवकर विकेट गमावल्याने रिचर्ड सेलेट्सवेन आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला मुशीर खानने तोडले. प्रिटोरियस १०२ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.

अशी आहे भारताची बॉलिंग

भारतासाठी राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. या दरम्यान ९व्या ओव्हरमध्ये ६० धावा खर्च केल्या. याशिवाय मुशीर खानने २ विकेट मिळवल्या. या दरम्यान मुशीरने १० षटकांत ४३ धावा खर्च केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -