Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीची छापेमारी

मनी लाँड्रिंगप्रकरणी जवळपास १० ठिकाणी टाकली छाप


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. ईडी (ED) हात धुवून त्यांच्यामागे लागली आहे. त्यातच आता केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे दिल्लीत जवळपास १० ठिकाणी ईडीने छापेमारी (Raids) केली आहे. ही ठिकाणे केजरीवालांच्या निकटवर्तीयांची आहेत. मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.


आपचे राज्यसभा खासदार एन. डी. गुप्ता (N. D. Gupta) यांच्या घरावर तसेच अरविंद केजरीवालांचे खासगी सचिव विभव कुमार (Vibhav Kumar) यांच्या घरावर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली जल बोर्डाचे माजी मेंबर शलभ यांच्या निवासस्थानी देखील छापे टाकले जात आहेत.


मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) सातत्याने कारवाई करत आहे. आज या प्रकरणी ईडीने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पार्टीशी संबंधित बड्या नेत्यांच्या घरांवर छापेमारी केली आहे. ईडी सुमारे १० ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे.


Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१