Sunday, June 22, 2025

राजकीय पक्षाच्या प्रचारात, रॅलीत लहान मुलांचा समावेश टाळा-निवडणूक आयोगाचे निर्देश

राजकीय पक्षाच्या प्रचारात, रॅलीत लहान मुलांचा समावेश टाळा-निवडणूक आयोगाचे निर्देश

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजकीय पक्षांना कोणत्याही पक्षाच्या कामाच्या किंवा प्रचाराच्या वेळेस लहान मुलांचा समावेश करणार्‍यावर बंदी घातली आहे. लहान मुलांना या पासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक आयोगाने हे निर्देश राजकीय पक्ष, उमेदवार आणि इलेक्शन मशिनरी यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांगा बद्दलही सहानुभूती दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.


पोस्टर्स/पॅम्प्लेटचे वाटप असो किंवा घोषणाबाजी, प्रचार रॅली किंवा निवडणूक सभांमध्ये सहभागी होण्यासाठी, राजकीय पक्षांनी “कोणत्याही स्वरूपात” मुलांचा वापर करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.




Comments
Add Comment