Ind vs Eng: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३३२ धावा

Share

विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ६७ धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची आवश्यकता आहे.

पहिला विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या स्थानावर पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वीही ठरला. याशिवाय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात एकूण २५५ धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाची सुरूवात भारताच्या दुसऱ्या डावासोबत झाली. तेव्हा भारताच्या बिनबाद २८ धावा झाल्या होत्या. या दरम्यान यशस्वी जायसवालने १७ बॉलमध्ये १५ तर कर्णधार रोहित शर्मा १९ बॉलमध्ये १३ धावांवर खेळत होते. भारतासाठी तिसरा दिवस काही खास राहिला नाही. कारण त्यांनी तीन सत्रे न खेळताना सर्व १० विकेट गमावल्या. या दरम्यान इंग्लंडसाठी स्पिनर टॉम हार्टलेने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. भारतासाठी शुभमन गिलने शतक ठोकताना १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली.

दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडिया आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावांवर ऑलआऊट झाली. दोन्ही डावांत बॅटिंग केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले. तिसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने १ विकेट गमावताना ६७ धावा केल्या यानंतर दोन दिवसांमध्ये विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.

दिवस संपेपर्यंत इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्रॉली ५० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावांवर नाबाद आहे. तर रेहान अहमद ८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ९ धावांवर नाबाद आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

5 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

6 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

6 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

7 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

7 hours ago