Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीpolished की unpolished तांदूळ, दोघांपैकी कोणता आहे जास्त हेल्दी?

polished की unpolished तांदूळ, दोघांपैकी कोणता आहे जास्त हेल्दी?

मुंबई: अनेकदा आपण घरांमध्ये ऐकतो की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भात खाणे सोडले पाहिजे. मात्र अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अनपॉलिश्ड तांदूळ खाल्ला पाहिजे. कारण पॉलिश तांदळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हाय असते. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे डायबिटीज असेलल्या लोकांनी पांढरा भात खाऊ नये.

अनेक आरोग्य तज्ञांच्या मते पॉलिश तांदळाच्या जागी तुम्ही ब्राऊन राईस, लाल तांदूळ खाऊ शकता. खरंतर असे मानले जाते की फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंगदरम्यान पॉलिस केलेल्या तांदळातील शर्व मिनरल्स आणि व्हिटामिन्स संपून जातात.

यात केवळ कार्ब्स आणि स्टार्चच राहतात. जे मोठ्या प्रमाणात अनहेल्दी असते. तर ब्राऊन राईस तसेच लाल तांदूळामध्ये सगळे पोषकतत्व असतात. यात कोणत्याही प्रकारची केमिकल प्रोसेस होत नाही.

पांढरा पॉलिश केलेल्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स मोठ्या प्रमाणात असतो जो डायबिटीजच्या रुग्णांसाठी धोकादायक असतो. तर अनपॉलिश्ड राईसमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनसाठी अतिशय चांगले असते. यामुळे पोट भरलेले राहते. जर तुम्ही पॉलिश केलेला तांदूळ खाता तर त्याने लवकर पोट भरत नाही आणि जास्त अन्न खाल्ले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -