IND Vs ENG: दुसऱ्या कसोटीत भारताची झोप उडवेल इंग्लंड, कोचनी बनवला हा खास प्लान

  43

मुंबई: इंग्लंडने दोन फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजांची झोप उडवेल असा प्लान तयार केला आहे. टॉम हार्टलेविरुद्ध भारताचे फलंदाज अयशस्वी ठरत असतानाच इंग्लंडचा संघ चार स्पिनर्ससोबत मैदानात उतरू शकतो. इंग्लंडचा हा निर्णय योग्यही ठरू शकतो कारण विशाखापट्टणमची पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. इंग्लंडचे कोच ब्रँडम मॅकक्युलमचा दावा आहे की ते चार स्पिनर्ससोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात घाबरणार नाही.


इंग्लंडने पहिल्या कसोटीत टीम इंडियाला २८ धावांनी हरवले . इंग्लंड या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. आता दुसऱ्या कसोटी २० वर्षीय युवा स्पिनर शोएब बशीरही खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मॅकक्युलमने म्हटले हार्टिलेला पहिली कसोटी खेळण्याचा प्लान यशस्वी झाला.


इंग्लंडचे कोच म्हणाले, हार्टिले पहिला सामना केळत होता. याआधी हार्टिलेने केवळ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळी केली होती. आमची निवड योग्य ठरली. हार्टिलेने दाखवून दिले की हरलेला डाव कसा जिंकता येतो. आम्हाला अशा प्रकारचे बोल्ड निर्णय घेण्याची गरज आहदरम्यान, इंग्लंडचा हा निर्णय घेणे तितके सोपे असणार नाही. इंग्लंडचा सगळ्यात अनुभवी स्पिनर जॅक लीच दुखापतीने ग्रस्त आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणे नक्की नाही. बेन स्टोक्सने लीच खेळण्याच्या शक्यतेला नाकारले नाही. याशिवाय इंग्लंडचा स्पिनर रेहन पहिल्या कसोटीत अपयशी ठरला होता. भारताच्या फलंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला होता.


इंग्लंडच्या संघाला जेम्स अँडरसनची कमतरता भासत असल्याचे कसोटी सामन्यात दिसत होते. सामन्यात अनेक ठिकाणी असे जाणवले. दरम्यान, विशाखापट्टणमची पिच हैदराबादपेक्षाही स्पिनर्सला अधिक फायदेशीर ठरू शकते.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी