
मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने १८ जानेवारीला पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले होते. लग्नाच्या दोन दिवसांनी जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. सनासोबतच्या लग्नाच्या घोषणेनंतर हे स्पष्ट झाले होते की शोएबने आपली दुसरी पत्नी सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे. सना जावेदसोबत लग्नानंतर शोएबला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यानंतर शोएबने यावरील मौन सोडले आहे.
एका पॉडकास्टवर बोलताना शोएब म्हणाला, तुम्ही तेच केले पाहिजे जे तुमचे मन सांगेल. लोक काय विचार करतील याचा विचार करू नये. याचा अजिबात विचार करू नये. लोक का विचार करतील हे शिकण्यास भले वेळ लागेल. मग त्याला १० वर्षे लागोत अथवा २० वर्षे तुम्ही तुमच्या मनाचेच केले पाहिजे.
View this post on Instagram
खुला घेऊन पतीपासून वेगळी झाली सानिया
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी २०१०मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगा इजहानही आहे. शोएब आणि सानिया घटस्फोटानंतर आपल्या मुलाचे संगोपन मिळून करतील. सानिया मिर्झाच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या विधानानुसार टेनिस स्टार पतीपासून खुला घेत वेगळी झाली.
शोएबच्या लग्नावरून घरातले नाराज
मिळालेल्या माहितीनुसार शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नामुळे त्याच्या घरातले नाराज आहेत. त्याच्या लग्नात शोएबच्या घरातले सदस्य नव्हते. त्याच्या छोट्या भावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.