परीक्षा पे चर्चा : सकारात्मक जीवनाचा मंत्र

‘नेमिची येतो मग पावसाळा...’ या काव्यपंक्तीप्रमाणे दरवर्षी परीक्षा येतात. शाळकरी मुलांना ज्या परीक्षेचे दडपण येते, ती परीक्षासुद्धा दरवर्षी येत असते. पावसाळ्याची शेतकरी वर्ग आगुंतकपणे वाट पाहत असतो. पण विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण असते. परीक्षेतील मार्क हे समाजातील उच्चोत्तम दर्जाशी तुलना करणारा भाग झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यापेक्षा पालकांमध्येही अप्रत्यक्ष स्पर्धा लागलेली असते. आपल्या मुलांना शाळेत किती गुण मिळाले, यावर पालकांच्या आनंदाच्या व्याख्या नव्याने तयार झाल्या आहेत, हे नव्याने सांगायला नको. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ हा अभिनव उपक्रम राबवून देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचा परीक्षांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात नव्याने भर पाडण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘परीक्षा पे चर्चा’च्या ७व्या आवृत्तीदरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला, तेव्हा देशाचा कारभार चालविणारी व्यक्तीसुद्धा किती तन्मयतेने या गोष्टीकडे पाहत आहे, हे दिसून आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ ही आता एक चळवळ केली आहे. त्यात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाला एकत्र आणून एक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. एवढंच नव्हे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी शाळकरी झालेल्या चिमुकल्यांच्या प्रश्नांना पंतप्रधान दिलखुलासपणे उत्तर देताना दिसले. या चर्चेत प्रत्येक मुलांना प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले. पालक आणि विद्यार्थी यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक नावाची एक व्यक्ती सध्या कार्यरत असते. पंतप्रधानांनी एखाद्या समुपदेशकापेक्षा चांगली भूमिका निभावल्याचे दिसून आले. यावेळी मोदी यांनी पासलकांना केलेले समुपदेशन तितकेच महत्त्वाचे अहे. कौटुंबिक परिस्थितीत अनेकदा स्पर्धेची बीजे रोवली जातात. त्यामुळे भावंडांमध्ये विकृत स्पर्धा निर्माण होते. याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पालकांनी मुलांमध्ये तुलना करणे टाळावे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका. आपल्या मुलांचे प्रगती पुस्तक (रिपोर्ट कार्ड) हे व्हिजिटिंग क

Comments
Add Comment

मरता, क्या नहीं करता?

गेल्या विधानसभा निवडणुकांपासून एकत्र येणार होते, ते दोन भाऊ शुक्रवारी अधिकृतरीत्या एकत्र आले. राज्यात बऱ्याच

शेजाऱ्याचे जळते घर

बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच स्फोटक वातावरण असते. हे दोन्ही देश भारताच्या

हवा मुंबईची

वायुप्रदूषणाची अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली. प्रथम दर्शनी अहवालात कोणत्याही निकषाचे पालन केले नाही

सगळ्यांचेच अंदाज खरे!

मतदानोत्तर चाचण्या, सर्वेक्षणानंतर बांधलेले निवडणुकीचे अंदाजही चुकतात. पण, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या

अशांत बांगला

१९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी युद्ध करून पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. पण तो बांगलादेश आज

काँग्रेसचा नारा कितपत खरा?

पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा मोठा वर्ग आजही