मुंबई: अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा-चपाती खाल्ली जाते. हा एक प्रकारचा पोटभरीचा नाश्ता मानला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का हा पोटभरीचा पदार्थ तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करत असतो. चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी जरी चांगले असले तरी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते गरम पेय पदार्थासोबत चपाती हे एक खराब कॉम्बिनेशन आहे. चपातीसोबत चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारण कॅफेनयुक्त चहा अथवा कॉफी तुमच्या पोटात अॅसिड बेस संतुलन बिघवते. यामुळे चपाती अथवा पराठा हे जड पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडू शकते.
चहामधील फेनोलिक केमिकल्स पोटातील आर्यन-कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेशनला स्टिम्युलेट करतात. यामुळे शरीरात आर्यन शोषण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये. ज्या लोकांना आर्यनची कमतरता आहे त्यांनी खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये.
चहामध्ये आढळणारे टॅनिन प्रोटीनसोबत मिळून अँटीन्यूट्रिएंट्सप्रमाणे काम करतात. एका अभ्यासानुसार टॅनिन या प्रोटीनला ३८ टक्क्यांपर्यंत कमी करतात. अशातच चहासोबत चपाती अथवा पराठा खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.
जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून चहा प्या. कोणत्याही प्रकारचे भोजन केल्यानंतर कमीत कमी ४५ मिनिटांनी चहा प्या. नाश्ता अथवा दुपारचे जेवण केल्यानंतर १ तासांनी अथवा संध्याकाळी स्नॅक्ससोबत तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकता.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…