नवी दिल्ली: ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला(paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून(indian reserve bank) मोठा झटका बसला आहे. खरंतर, बुधवारी डिजीटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिस देणारी कंपनी पेटीएमच्या बँकिंग शाखा पेटीएम पेमेंट बँकेला नवे ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच PPBLमध्ये आता कोणतेही नवे ग्राहक जोडले जाणार नाहीय. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी हे आदेश दिले.
पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिलेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ यानंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.
बँकेच्या ग्राहकांकडून सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, प्रीपेड इस्ट्रुमेंटेस, फास्टॅटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसह आपल्या खात्यात राहिलेली रक्कम अथवा त्याचा उपयोगाची परवानगी कोणत्याही बंदीशिवाय दिली जाणार आहे.आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकविरुद्ध ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा परिणाम गुरूवारी पेटीएमच्या शेअर्सवर दिसू शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरले होते.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…