मुंबई: थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याने सारेजण हैरण होतात. या मोसमात शरीरात मोठ्या प्रमाणात कफ जमा होतो. काही लोकांना तर या संपूर्ण हंगामादरम्यान सर्दीखोकल्याचा त्रास होत असते. अशातच तुम्हाला माहीत असणे गरजेचे असते की शरीरात कफ बनण्याचे काय कारण आहे.
शरीरामध्ये कफ का तयार होतो?
कफ एक पातळ चिकट द्रव्य पदार्थ आहे जे तुमच्या श्वासनलिकेची सफाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र जर हा कफ वाढला तर तुमच्यासाठी बऱ्याच समस्या निर्माण करतो. घश्यात खवखव, सातत्याने खोकला, यामुळे उलटी होणे हे कफ वाढल्यामुळे होऊ शकते. शरीरात कफ वाढल्याने श्वासनलिकेला सूज, अॅल्रजी, घश्यात अथवा फुफ्फुसांमध्ये जळजळ, फुफ्फुसांचा कॅन्सर, सिस्टीक फायब्रोसिस, ब्रोन्कायटिससारखे आजार निर्माण होऊ शकतात.
काय आहेत कफ कमी करण्याचे उपाय
खूप पाणी प्या
डिहायड्रेशनमुळे कफ वाढतो. यामुळे जितके शक्य असेल तितके पाणी प्या. तसेच मुलांनाही भरपूर पाणी द्या. दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवा. पाणी प्यायल्याने कफ मोकळा होण्यास मदत होते तसेच आरामात बाहेर निघतो. श्वास नलिकेत कफ जमा झाल्यास तो पाणी प्यायल्याने बाहेर निघण्यास मदत होते.
घरात रूम हीटरचा वापर नका करू
कोरड्या हवेमुळेही शरीरात कफ वाढू लागको. स्टीम शॉवरच्या माध्यमातून कफ बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
घश्यात खवखव अथवा कफ जमा झाल्याने कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे घश्याची सूज कमी होईल.