Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

श्रीरामांचे दर्शन होणार सोपे! दिल्लीच नव्हे मुंबई, पटनासह ८ शहरांतून अयोध्येसाठी थेट विमानसेवा

श्रीरामांचे दर्शन होणार सोपे! दिल्लीच नव्हे मुंबई, पटनासह ८ शहरांतून अयोध्येसाठी थेट विमानसेवा

मुंबई: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या उत्तर प्रदेशातील अयोध्येत जगभरातून लोक भेट दण्यास येत आहे. अयोध्या पोहोचण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने नागरी उड्डाण मंत्रालय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.


अयोध्येत राम मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुविधााजनक बनवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय १ फेब्रुवारी २०२४ पासून ८ नवे उड्डाण मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. नवे उड्डाण मार्ग अयोध्येला दिल्ली,चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बंगळुरूला जोडले जातील.



केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया करणार उद्घाटन


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधी या उड्डाण सेवांचे उद्घाटन करतील आणि स्पाईस जेट विमानाच्या नव्या मार्गावर उड्डाण करतील.


 


गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडिया एक्सप्रेसने अयोध्येवरून बंगळुरू आणि कोलकातासाठी नव्या मार्गांची घोषणा केली होती. यानुसार १७ जानेवारीपासून नवे मार्ग सुरू केले.



सगळ्यात भव्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार अयोध्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येत बनलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. अयोध्येत विमानतळाची निर्मिती ही तेथील भविष्यात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात आली आहे. याच्या निर्मितीसाठी ३५० कोटी रूपये खर्च झाले आहेत.

Comments
Add Comment