Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीBigg Boss 17 : अंकिता लोखंडे नव्हे तर 'हा' ठरला बिगबॉस १७...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे नव्हे तर ‘हा’ ठरला बिगबॉस १७ चा महाविजेता

टॉप ३ मध्ये देखील येऊ शकली नाही अंकिता

मुंबई : टीव्ही मनोरंजन विश्वातील बिगबॉस हा फारच लोकप्रिय शो आहे. हिंदीतील बिगबॉस १७ व्या सीझनमध्ये (Bigg Boss 17) पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बरीच चर्चेत आली होती. अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) एक्स गर्लफ्रेंड असल्याने त्याच्या नातेसंबंधांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा ती या शो दरम्यान करत होती. शिवाय ती उत्तम खेळतही होती. चर्चेत कसं राहावं हे तिला पक्कं माहित होतं. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांना तीच जिंकणार अशी खात्री होती. मात्र, सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत अंकिता स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमधून (Grand Finale) थेट बाहेर पडली. बिग बॉस १७ च्या महाविजेते पदावर मुनावर फारुकीने (Munawar Faruqui) आपले नाव कोरले. मुनावर फारुकी, अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-१७ या कार्यक्रमाचे टॉप-३ स्पर्धक ठरले.

बिग बॉस १७ च्या टॉप ५ मध्ये मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे हे फायनलमध्ये पोहोचले होते. मात्र मन्नारा व अंकिताने निराशा केली आणि घरातल्या सर्व स्पर्धकांवर मात करत मुनावरने बाजी मारली. काल बिग बॉस-१७ या सीझनचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. मुनावरचा काल वाढदिवसही होता. महाविजेते पद पटकावल्याने त्याचा वाढदिवस त्याच्यासाठी अत्यंत खास ठरला आहे. सलमान खानने (Salman Khan) मुनावर फारुकीला बिग बॉस-१७ या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.

मुनावर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो. मुनावर त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. लॉक-अप या शोमुळे मुनावरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. ७० दिवस मुनावर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता. हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनावरला ट्रॉफी, २० लाख रुपयांचे रोख पारितोषिक व एक कार मिळाली. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -