Atal Setu : अटल सेतूने दहा दिवसांत केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई

मुंबई : अटल सेतूचे (Atal Setu) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांवर आला आहे. हा सेतू सुरु झाल्यापासून लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकजण केवळ फेरफटका मारायला अटल सेतूवर जातात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोक उत्सुक बनत चालले आहेत.


अटल सेतूवर वाहन थांबवून सेल्फी काढण्याची परवानगी नसल्यामुळे असे सेल्फी काढणार्‍यांकडून चांगलाच दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत या सेतूवरुन ३ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. यामधून तब्बल ६ कोटी रुपये टोलवसुली झाली आहे. येत्या काळात अटल सेतूवर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

'बाल आधार' नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त

यूआयडीएआयकडे तातडीने उपाययोजनेची मागणी लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील

पोलीस स्टेशनच्या आवारात सोयीसुविधांसह ५५ हजार घरे बांधणार

प्रकल्पाचा अभ्यास व शिफारसीसाठी समिती स्थापन मुंबई  :  गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी झाडूंवर दीड कोटींचा खर्च!

मुंबई (प्रतिनिधी) :  स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च

अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल व सुधारणा कामांसाठी मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध देखभाल, सिग्नलिंग आणि यार्ड रीमॉडेलिंगसाठी मेगाब्लॉक