Share

पतंग आभाळी उडेल आता..!!

बोचरी थंडी सरेल आता
वारा झूळझूळ सुटेल आता
शेपट्या लावून रंगबिरंगी
पतंग आभाळी उडेल आता

मैदानी या गजबज होऊन
सवंगडी हे जमतील आता
कच्चा पक्का मांजा ओढून
काटम काटी चालेल आता

पतंग माझा पतंग त्याचा
अलग ढाचा ज्याचा त्याचा
हरणाराही जिंकणारासह
निखळ आनंद लुटेल आता

हिरवा, निळा, लाल, पिवळा
रंग आभाळा चढेल आता
वेळ मुलांचा मजेत जाईल
अवघे आभाळ कवेत घेता

पतंग आभाळी उडेल आता
झिंग वेगळी चढेल आता
दहा हत्तीचे बळ संचारून
भूक मुलांची हरेल आता

– भानुदास धोत्रे, परभणी

वासुदेव

प्रसन्न होते पहाट
सूर्य किरणे अंबरात
भूपाळीच्या मधुर सुरात
वासुदेव उभा दारात…

किणकिण घंटी नाद
मंजुळ घुंगरांची साथ
पहाटेच्या ओवी संगे
वासुदेव उभा दारात…

डोईवर मोरपंखी टोप
गळ्यात कवड्यांची माळ
शुभ्र पेहरावात सजून
वासुदेव उभा दारात…

कधी छेडतो सुंदर ताण
कधी सांगतो भविष्य छान
झोळी भरण्या दारिद्र्याची
वासुदेव उभा दारात…

– हिरकणी राजश्री बोहरा, डोंबिवली – ठाणे

पूर्वेचा सूर्य!

छता-छतांवर आगाज झाला,
“टप-टप” दवबिंदूंनी आवाज दिला…
रात्रीच्या पहाऱ्याचा वेळ संपला,
चांदण्या पहुडल्या विश्रांतीला…

पहाटेचा मंद, शीतल,
ऊर्जित वारा,
पहिल्या प्रहरी प्रकाश मोहरला…
सृष्टीने ताजा नवा श्वास भरला,
वेली फुलांना सुगंधत केला…

क्षितिज केशरी रसाळ झाला
तत्पर दिवाकराच्या आगमनाला…
आकाशाची कमान स्वागताला
निसर्गाने कॅनव्हासमध्ये
रंग भरला…

सोनेरी दागिने परिधान करण्या
शहरात टॉवर्सने
माना उंचावल्या…
पूर्वेच्या क्षितिजी उदयी आला
प्रभाकराने सोनेरी
प्रकाश उधळला…

उगवत्या सूर्याची लाली
अखिल सृष्टी कार्यरत झाली…
नमन विश्वाच्या अविष्काराला
पूर्वेच्या क्षितिजी उदयी आला..
प्रभाकराने सोनेरी…
प्रकाश उधळला…
प्रभाकराने सोनेरी…
प्रकाश उधळला…

– विनायक आजगणकर, परळ

Recent Posts

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

3 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

10 minutes ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

1 hour ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

2 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

3 hours ago