Nitish Kumar : बिहारमध्ये होणार सत्तापालट! भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नितीश कुमार

नव्या सरकारचा आजच पार पडणार शपथविधी


पाटणा : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना (Bihar Politics) प्रचंड वेग आला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी (India Alliance) पुढाकार घेतलेले नितीश कुमारच (Nitish Kumar) आता भाजपमध्ये (BJP) सामील होणार असल्याने इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. बिहारमध्ये आरजेडी (RJD) आणि जेडीयू (JDU) या पक्षाचे एकत्रित सरकार होते. मात्र नितीशकुमारांनी या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्तही केला आणि आजच ते भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सत्तापालट होणार असून इंडिया आघाडी अडचणीत सापडली आहे.


नितीशकुमारांसोबत भाजपचे आणखी दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात भाजप व जेडीयूचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सत्ता पालटली असून राज्य सरकारची समीकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, 'महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच कामं राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत'. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.





नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत (NDA) जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११