Manoj Jarange : आम्ही आझाद मैदानात जाणारच, मनोज जरांगेंचा ठाम निर्धार

लोणावळा : आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.


मनोज जरांगे यांनी सांगितले की, जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.



आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही


मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार? सगेसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का? असे सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आम्हाला परवानगी नाकारलेली नाही. कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली. मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दगाफटका होऊ नये सावध राहिलेलं बरं. त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचे त्यांनी सांगितले.



आझाद मैदानात तयारी सुरु


दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या २६ जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. "आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती. आम्ही स्टेज बांधण्याचे काम सुरु केले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु" असे मराठा महासंघाचे नेते वीरेंद्र पवार यांनी सांगितले.



मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो


मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे यांनी म्हटले की, कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा, मनोज जरांगे यांनी घेतला आहे.



मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत


दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असे जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा