Republic Day : यवतमाळमध्ये साकारलेली शिल्पे असणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा कोणती थीम?

यवतमाळची मान दिल्लीत उंचावणार!


नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2024) राजधानी दिल्लीत राजपथावरील (Rajpath) चित्ररथ (Chitrarath) पाहण्यासाठी अवघे भारतवासी उत्सुक झालेले असतात. प्रत्येक राज्य दरवर्षी आपल्या राज्याच्या वैशिष्ट्यांप्रमाणे चित्ररथ साकारत असतात. याचे थेट प्रक्षेपण संपूर्ण देशभरात केले जाते. यंदाही याची राजपथावर जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक कर्तव्यपथावरील तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली.


दिल्लीमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात (Parade) 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही शिल्पे साकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्पे (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले जाणार आहे.



कसा असणार यंदाचा चित्ररथ?


'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह आई जिजाऊंची प्रतिकृती आहे. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज, कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य आहे. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात आहेत.


या चित्ररथासोबत दानपट्टा, तलवारबाजी, नृत्य आदी कला सादर करण्यात येणार आहेत. 'भैरी भवानी परफॉर्मिंग आर्टस्' या ग्रुपचे कलाकार या कला सादर करणार आहेत. तसेच यातील काही कलाकार शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्या भूमिका साकारणार आहेत.



यवतमाळच्या स्टुडिओमध्ये साकारले शिल्प


चित्ररथ साकारताना तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तर, यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, जि. यवतमाळ) शिल्पकला विभागाचा प्रमुख आहे. त्याच्या समुहामध्ये भूषण हजारे (कळंब), सूरज गाऊत्रे (सोनबर्डी, ता. केळापूर), पिंटू भोंग (पहापळ, ता. केळापूर), नितेश बावणे (घाटंजी), अक्षय बावणे, योगेश वहिले, अविनाश बावणे, निखिल दूर्षेट्टीवर, अरुण मेश्राम, सुमीत कानके (सर्व रा. पाटणबोरी) आदी शिल्पकारांचा समावेश आहे. पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.


२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा यांचं दर्शन घडवणारी राज्यांची, केंद्रशासित प्रदेशांची आणि विविध मंत्रालयांचे चित्ररथ दिसतील.

Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट