Monday, July 8, 2024
Homeक्रीडाRohan Bopanna : भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णाने रचला इतिहास!

Rohan Bopanna : भारताचा टेनिस स्टार रोहन बोपण्णाने रचला इतिहास!

पुरुष दुहेरी स्पर्धेची उपांत्य फेरी तर गाठलीच, पण आणखी एका विक्रमावर कोरले नाव

मुंबई : भारताचा टेनिस (Tennis) स्टार रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरुष दुहेरी स्पर्धेच्या (Men’s doubles) उपांत्य फेरीत प्रवेश करताना ग्रँड स्लॅम इतिहास रचला. बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅथ्यू एबडेन (Matthew Ebden) यांनी बुधवारी मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी (Maximo Gonzalez and Andres Molteni) या अर्जेंटिनाच्या जोडीवर सरळ सेटमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरी (Semifinales) गाठली. या विजयासोबतच त्यांनी आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपनमधील उपांत्यपूर्व फेरीतील विजयामुळे वयाच्या ४३ व्या वर्षी बोपण्णा हा जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष दुहेरीचा खेळाडू बनला आहे. क्रमवारीनुसार तो ही उपांत्य फेरी गाठणारा इतिहासातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. याआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये राजीव राम या ३८ वर्षीय अमेरिकन खेळाडूने हा विक्रम केला होता. तर रोहनचा साथीदार ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यूने या क्रमावारीत दुसरे स्थान पक्के केले आहे.

बोपण्णा १७ प्रयत्नांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला. सामना सुरू झाल्यापासूनच बोपण्णा आणि मॅथ्यू यांनी विरोधी खेळाडूंना संधीच दिली नाही. ते मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. बोपण्णा आणि त्याच्या जोडीदाराने एक तास ४६ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्झिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या सहाव्या मानांकित अर्जेंटिनाच्या जोडीवर ६-४, ७-६, ७-५ असा सहज विजय नोंदवला आणि सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला.

याआधी रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅट एबडेन यांनी नेदरलँडच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सीडेड जोडीनं कूलहॉफ आणि मेक्टिक या माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा ७-६, ७-६ असा पराभव केला. आता सेमीफायनल्सच्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा ६-४, ७-६, ७-५ असा पराभव केला आहे. यानंतर ही इंडो-ऑस्ट्रेलियन जोडी उपांत्य फेरीत बिगरमानांकित टॉमस मॅचॅक आणि झिझेन झांग यांच्याशी सामना करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -