Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीTata group : टाटा समूहाकडून अयोध्येत उभारलं जाणार हॉटेल; यूपीची होणार चांदी!

Tata group : टाटा समूहाकडून अयोध्येत उभारलं जाणार हॉटेल; यूपीची होणार चांदी!

यूपीच्या वार्षिक उत्पन्नात होणार तब्बल ‘इतकी’ वाढ

अयोध्या : अयोध्येत काल राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) पार पडलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratistha) सोहळ्याला अनेक देशातील नामवंत उद्योगपतींनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीमध्ये मोठा वाटा असलेल्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) देखील उपस्थित होते. मंदिराच्या निर्मितीनंतर आता टाटाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (Tata Group IHCL) मोठी घोषणा केली आहे. कंपनीने उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात तिसरे हॉटेल उघडण्याचे कंत्राट जाहीर केले आहे.

टाटा समूहाकडून आता अयोध्या शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचा प्रयत्न असून अयोध्येत एक मोठं हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये टाटा समूहाची दोन मोठी हॉटेल्स असून अयोध्येतील हे तिसरे हॉटेल असणार आहे. आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनित चटवाल ​​म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहे. हे शहर जगभरातील पर्यटकांचा ओघ आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे.

टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येत निर्मित होणारे हे हॉटेल १.३ एकरमध्ये पसरलेले असेल. ज्यामध्ये १५० खोल्या असतील. हे हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ब्रँडच्या नियंत्रणाखाली निर्मित केलं जाईल.

यूपीची होणार चांदी; वार्षिक उत्पन्नात होणार २५ हजार कोटींची वाढ

अयोध्येच्या संपूर्ण बदलाची तयारी सुरू आहे. केवळ टाटा समूहच नाही तर देशातील इतर समूह आणि हॉटेल कंपन्याही येथे गुंतवणूक करत आहेत. रिअॅल्टी क्षेत्रातही प्रचंड गुंतवणूक होत आहे. या शहरात २५ हजार कोटी रुपयांची ग्रीनफिल्ड सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार आहे. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. एकूणच शहरात १० अब्ज डॉलर्स म्हणजेच ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्याच्या वार्षिक उत्पन्नात २५ हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -