Eknath Shinde : जो राम का नही वो कोई काम का नही!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका


मुंबई : अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर मुंबईतील दादर परिसरातून वडाळ्यातील राम मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी 'जो राम का नही वो कोई काम का नहीं', अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. राम मंदिराचे आमंत्रण असतानाही उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. यावरुन मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहासिक असून सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज कोट्यावधी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. हजारो, लाखो लोकांमध्ये आज उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


आज ठिकठिकाणी राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आशयाचे बॅनर लागले आहेत, पण यामध्ये ठाकरे गटाचे बॅनर कुठेही पाहायला मिळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'जो राम का नही वो कोई काम का नहीं', अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांना देखील अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण आले होते. परंतु अयोध्येला न जाता उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच त्यांनी यावेळी गोदातीरी जाऊन आरती देखील केली.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले आहेत. त्यांचं अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केलं. आजचा हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशाने अनुभवला अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांसह या रॅलीमध्ये शिंदे गटातील अनेक नेते देखील उपस्थित होते. राहुल शेवाळे, किरण पावस्कर, दीपक केसरकर देखील उपस्थित होते. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे देखील साकारण्यात आले होते. ऐतिहासिक अशी शोभायात्रा रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने निघाली असल्याची प्रतिक्रिया यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.