Bharat Ratna Award: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली: बिहारचे(bihar) माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर(karpoori thakur) यांना भारतरत्न दिला जाणार आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार आहे. सरकारने ही घोषणा कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केली आहे. २४ जानेवारीला त्यांची जयंती आहे.


कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी दीर्घकाळापासून केली जात होती. मंगळवारी जदयू नेते केसी त्यागी ठाकूर यांना भारतरत्न देण्यासोबतच त्यांच्या नावाने विश्वविदयालय सुरू करण्याची मागणी केली होती.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत सोशल साईटवरून कर्पूरी ठाकूर यांचा फोटो शेअर करत लिहिले, मला आनंद आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तेही अशा वेळेस जेव्हा आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत.


 


कर्पूरी ठाकूर यांना बिहारमध्ये जननायक म्हणून ओळखले जाते. ते काही काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १९७० ते १९७१ या कार्यकालात काम केले होते. त्यानंतर डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर राहिले. पहिल्यांदा ते सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते आणि दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.



स्वतंत्रता आंदोलनात झाले होते सहभागी, तुरुंगातही गेले होते


कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्याच्या पिताँझिया गावात गोकूल ठाकूर आणि रामदुलारी देवी यांच्या घरात झाला होता. विद्यार्थी जीवनात राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होते आणि ऑल इंडिया स्टुंड्टस फेडरेशनमध्ये सामील होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनात सामील होण्यासाठी स्नातक कॉलेज सोडले होते. स्वतंत्रता आंदोलनात सामील होण्यासाठी त्यांनी २६ महिने जेलमध्ये घालवले होते.

Comments
Add Comment

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

आयुष मंत्रालयाचा झेप्टोसोबत सामंजस्य करार

आता १० मिनिटांत औषधं दारात! नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध

योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली