U-19 World Cup 2024: टीम इंडियाची विजयी सुरूवात, बांगलादेशला ८४ धावांनी हरवले

  54

मुंबई: भारतीय संघाने अंडर १९ विश्वचषकाची दमदार सुरूवात केली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. बांगलादेशला ८४ धावांनी मोठा पराभव सहन करावा लागला. बांगलादेशसमोर विजयासाठी २५२ धावांचे आव्हान होते मात्र संपूर्ण संघ ४५.५ षटकांत केवळ १६७ धावांवर आटोपला. बांगलादेशसाठी मोहम्मद शिहाब जेम्सने सर्वाधिक ७७ चेंडूत ५४ धावा केल्या. अरिफुल इस्लामने ७१ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. मात्र बाकी फलंदाजांनी निराशा केली.


भारतासाठी सौम्य पांडेने सर्वाधिक विकेट मिळवल्या. सौम्य पांडेने ९.५ षटकांत २४ धावा देत ४ खेळाडूंना माघारी पाठवले. मुशीर खानला २ बळी मिळवता आले. याशिवाय राज लिंबानी, अर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशु मोलियाने १-१ विकेट मिळवल्या.



भारतीय संघाने केल्या २५१ धावा


याआधी बांगलादेशचा कर्णधार टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या टीम इंडियाने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. भारतासाठी आदर्श सिंहने सर्वाधिक ९६ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. याशिवाय भारतीय कर्णधार उदय सहारनने ९४ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार लगावले. बांगलादेशसाठी इकबाल हौसेन इमौन सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला.



टीम इंडियाच्या विजयानंतर किती बदलले पॉईंट्स टेबल?


या विजयानंतर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर आर्यंलंडचा संघ आहे. दरम्यान, भारत आणि आयर्लंड हे २-२ बरोबरीत आहे. मात्र चांगल्या रनरेटमुळे आयर्लंडचा संघ टॉपवर आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना २८ जानेवारीला खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार