Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाशोएब मलिकने नाही दिला घटस्फोट! सानिया मिर्झाने घेतला खुला, टेनिस प्लेयरच्या वडिलांनी...

शोएब मलिकने नाही दिला घटस्फोट! सानिया मिर्झाने घेतला खुला, टेनिस प्लेयरच्या वडिलांनी केला खुलासा

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी लग्न केले आहे. क्रिकेटरचे हे तिसरे लग्न आहे. याआधी शोएब मलिकने टेनिस प्लेयर सानिया मिर्झा आणि आयशा सिद्दीकी हिच्याशी लग्न केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच २० जानेवरीला जेव्हा शोएबने सनासोबतच्या आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा सगळेच हैराण झाले.

शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानतर क्रिकेटरच्या घरच्या सूत्रांनी कन्फर्म केले की शोएब आणि सानिया आता एकत्र नाहीत. दोघांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान, शोएबला घटस्फोट देण्याच्या बातम्यांवर आता सानिया मिर्झाचे वडील इमरान मिर्झा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

घटस्फोट नव्हे तर खुला घेतला

एका न्यूज एजन्सीशी बोलताना इमरान मिर्झा यांनी शोएबकडून सानियाला घटस्फोट दिल्याच्या चर्चांचे वृत्त फेटाळले. ते म्हणाले हा घटस्फोट नाहीये तर खुला होता. म्हणजेच सानियाकडून आपले रस्ते वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वेगळे झाल्यानंतर सोशल मीडियावर एकमेकांना करत आहेत फॉलो

शोएबपासून वेगळे झाल्यानंतरही सानिया मिर्झा इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे तर शोएबही सानियाला फॉलो करतो. दरम्यान, सानियाने इन्स्टाग्राम फीडवरून शोएबसोबतचे फोटो डिलीट केले आहेत.

खुला म्हणजे काय?

इस्लाम धर्मात जेव्हा महिलांना वेगळे व्हायचे असते तेव्हा त्या पतीकडे घटस्फोट मागू शकतात. याला खुला असे म्हणतात. म्हणजेच पतीकडून हा घटस्फोट नसतो तर पत्नीकडून असेल तर याला खुला असे म्हणतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -