Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीChhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने उडवल्या ३ कार, ७...

Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव ट्रकने उडवल्या ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा!

भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू तर सहाजण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati sambhaji nagar) काल संध्याकाळच्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघाताची घटना (Accident News) घडली. पैठण रोडवर नक्षत्रवाडीजवळ एका भरधाव ट्रकने ३ कार, ७ दुचाकी आणि १ रिक्षा उडवली. अपघातामधील मृतांबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

धुळे सोलापूर हायवेवरून पैठण रोडवर ट्रक उतरत होता. हा रस्ता अरुंद होता. त्यात रात्रीचेही काम चालू होते. त्यामुळे सोलापूरकडून धुळ्याकडे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा विचित्र अपघात झाला. उतारावरून खाली उतरत असताना भरधाव ट्रक थांबलेल्या वाहनांना उडवत गेला. संध्याकाळी सात वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये जवळपास १० ते १५ पेक्षा अधिक वाहनचालक जखमी झाले, त्यापैकी सहाजण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर जवळील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या अपघातामुळे रस्त्यावर वाहने, काचांचा ढिग साचला होता. अपघात झाल्यानंतर स्थानिकांची प्रचंड गर्दी झाली. शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले होते. सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामध्ये १ महिला जागीच ठार झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -