रोहितने रचला इतिहास, अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे आव्हान

बंगळुरू: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. यातील तिसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी २१३ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित शर्माने या सामन्यात जबरदस्त खेळी केली.

रोहित ठरला शतकांचा बादशाह


रोहित शर्माने या सामन्याक शतक ठोकले. त्याने ६४ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

सामन्यात एक वेळ अशी स्थिती आली होती की भारतीय संघाने अवघ्या २२ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या ोत्या. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेला १ धावा तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.

यानंतर रोहित शर्माने ६४ बॉलमध्ये शतक ठोकत नवा इतिहास रचला. रिंकू सिंहनेही आपले टी-२० आंतरराष्ट्रीयमधील अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात रोहितने ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले.

टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड


रोहित शर्मा - ५ शतके
सूर्यकुमार यादव - ४ शतके
ग्लेन मॅक्सवेल - ४ शतके

रोहितने मालिकेत खाते खोलले


रोहितने मालिकेत आपले खाते खोलले. पहिल्या दोन सामन्यात त्याला चांगली खेळी करता आली नव्हती. त्याने तिसऱ्या सामन्यात ७व्या बॉलवर आपले खाते खोलले. रोहित पहिल्या दोन सामन्यात खाते न खोलताच परतला होता. रोहितच्या नेतृत्वात जर आज भारतीय संघ हा सामना जिंकत असेल तर भारतीय संघ अफगाणिस्तानल ३-० असा क्लीन स्वीप करेल. याआधीच भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
Comments
Add Comment

BRICS : ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांचे संयुक्त घोषणापत्र

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Colombo Test : कोलंबो कसोटीत पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल, पडिक्कलचे शतक आणि गिलचे अर्धशतक

कोलंबो : देवदत्त पडिक्कलच्या सलग दुसऱ्या कसोटी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या

Shubman Gill : शुभमन गिलच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार,

AUS vs BAN : मिचेल स्टार्कची कमाल, ऑस्ट्रेलियाने मॅके कसोटी एक डाव आणि ५१ धावांनी जिंकली

मॅके : मिचेल स्टार्कने घेतलेल्या एकूण १० बळींच्या (मॅचमधील दोन्ही डावांत मिळून) जोरावर ऑस्ट्रेलियाने

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर मैदानातच राडा; फर्नांडोसोबत जोरदार बाचाबाची

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच