
मुंबई: अभिनेत्री ते लेखिका असा प्रवास केलेली ट्विंकल खन्ना वयाच्या ५०व्या वर्षी मोठी भरारी घेत आहे. अक्षय़ कुमारची पत्नी ट्विंकलने गोल्डस्मिथ युनिर्व्हसिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
अक्षय कुमारने आपल्या पत्नीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. सोबतच त्याने आपल्या पत्नीला सुपरवुमन म्हटले आहे. याची एक पोस्टही व्हायरल होत आहे.
अभिनेत्याने जो फोटो शेअर केला आहे त्यात तो पत्नीसोबत उभा दिसत आहे. ट्विंकल खन्नाने हिरव्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी नेसली आहे. सोबतच ग्रॅज्युएशन गाऊन आणि हॅट घातली आहे.
या कॅप्शनमध्ये अक्षय़ने लिहिले, दोन वर्षांपूर्वी जेव्हा तु मला म्हणालीस की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. तेव्हा मी विचार केला होता की तु खरंच याबाबतीत गंभीर आहेस का?
View this post on Instagram
मात्र ज्या दिवशी मी तुझी मेहनत पाहिली आणि पाहिले की स्टुडंट लाईफला तु आपले घर, करिअर, मुले आणि माझ्यासोबत मॅनेज करत आहे. ते पाहून मला समजले की तु एक सुपरवुमन आहेस.
याआधी एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने वयाच्या ४८व्या वर्षी कॉलेजला जाण्याबाबत म्हटले होते. तेव्हा तिने सांगितले होते की तिचा मुलगा आरवही अभ्यासासाठी कॉलेज शोधत आहे.
ट्विंकल आणि आरव यांनी एकाच कॉलेजमध्ये अप्लाय केले होते. यामुळे दोघेही घाबरलेले होते. त्यांना एकत्र युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचे नव्हते कारण हे गजब होते. ट्विंकल खन्नाने युनिर्व्हसिटी ऑफ लंडनच्या गोल्डस्मिथ येथून फिक्शन रायटिंगचा अभ्यास केला आहे. दोघेही अभ्यासाबाबत खूप उत्साहित होते आणि आता त्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे.