Ayodhya Ram Mandir : अयोध्येत आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

जाणून घ्या कसे असणार सर्व विधींचे वेळापत्रक


अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) येत्या २२ जानेवारीला रामलल्लाच्या (Ramlalla) गोंडस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. अवघे भारतवासी आणि हिंदूधर्मीय या क्षणासाठी आतुरले आहेत. या भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा आजपासून सुरु होणार आहे. आज १६ जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर १८ जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी काल माहिती देत सांगितलं की, १८ जानेवारीला राम मंदिराच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाची मूर्ती स्थानावर ठेवली जाईल आणि २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त वाराणसीच्या गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ठरवला होता. हजारो मान्यवर आणि सर्व स्तरातील दिग्गज लोक या शुभमुहूर्तावर उपस्थित राहणार आहेत.


शास्त्रोक्त आणि विधिवत पद्धतीने अभिजीत मुहूर्तावर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्ट माहिती देताना सांगितलं आहे की, या समारंभात गणेशवार शास्त्री द्रविड आणि काशीचे प्रमुख आचार्य, लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली १२१ आचार्य विधींचे निरीक्षण करतील.


१६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी औपचारिक विधी साजरे केले जातील. हे विधी पुढील वेळापत्रकाप्रमाणे आहेत.




  • १६ जानेवारी २०२४ : मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपतात. त्यामुळे आजपासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीही सुरू होतील.

  • १७ जानेवारी २०२४ : या दिवशी रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.

  • १८ जानेवारी २०२४ : या दिवसापासून अभिषेक विधी सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा होतील.

  • १९ जानेवारी २०२४ : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहे. आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.

  • २० जानेवारी २०२४ : राम मंदिराचे गर्भगृह ८१ कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करण्यात आले आहे. वास्तुशांती विधी होईल.

  • २१ जानेवारी २०२४ : या दिवशी, यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला १२५ कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल.

  • २२ जानेवारी २०२४ : या दिवशी मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे.
    २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२.२९ ते १२.३० पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यापाठोपाठ हाय-प्रोफाइल 'नमाज'वादाने बंगळुरु विमानतळ हादरले! भाजपचा काँग्रेसवर 'सुरक्षे'वरून हल्लाबोल!

'अतिसंवेदनशील' ठिकाणी परवानगी मिळाली का? - विरोधी पक्षाचा सरकारला थेट सवाल बंगळुरू: पुण्याच्या शनिवार वाड्यातील

बिहार निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर उद्या मतदान

पाटणा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्यांतील १२२ विधानसभा जागांवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी

जम्मू-काश्मीरमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त!

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटक श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

देशातील पहिला अत्याधुनिक एचपीसीएल रिफायनरी अंतिम टप्प्यात

या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदलला सीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)