Nitesh Rane : उद्धव ठाकरेंनी राम मंदिर आंदोलनातील सहभागाचा एक तरी पुरावा द्यावा

आमदार नितेश राणे यांनी दिले खुले आव्हान


कणकवली : राम मंदिर आंदोलनात रामकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, संघ कार्यकर्त्यांच्या सहभागाचे पुराव्यासकट फोटो उपलब्ध आहेत. हे सर्व कोणकोणत्या आंदोलनात आघाडीवर होते, हे त्यांना सिद्ध करावे लागत नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतल्याचा एक तरी पुरावा दाखवावा. हा पुरावा दिल्यास सामनामध्ये एक महिना नोकरी स्वीकारेन, असे खुले आव्हान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.


राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे त्यांच्याच घरचे लोक संशयास्पद (डाऊटमध्ये) बघतात. अशी डाउटफुल असलेली व्यक्ती, संजय राजाराम राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे, हे हास्यास्पद आहे. हा २०२४ चा फार मोठा विनोद असल्याचे राणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी तुमच्या मालकाची झोप उडविण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहेत. म्हणूनच ज्यांना सगळेच डाऊटफुली बघतात अशा, संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट, हाफ डाऊट बोलणे हा २०२४ चा फार मोठा विनोद आहे, अशा शब्दात आ. नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र डागले. कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


तर उद्धव ठाकरे यांना धमकी आली, यावर माझा विश्वास नाही, असे मत व्यक्त करताना राणे यांनी ‘मातोश्री’मध्ये राहणारे उद्धव ठाकरे यांना मानेवर बसलेला मच्छर मारता येत नसल्याचे सांगितले. त्यांना धमकीचा फोन पाटणकरांच्या घरातून केलेला असेल. या बंटी - बबलीवर विश्वास ठेवू नका. स्वतःचे संरक्षण वाढविण्यासाठी हा बनाव असल्याची टीका आ. राणे यांनी केली. त्यापूर्वी ठाकरे कुटुंबाचे संरक्षण करण्याची जबाबदारी शिवसैनिकांकडे होती. मात्र आता निष्ठावान सैनिक राहिले नसल्याचे दिसदत आहे, असा टोला राणे यांनी लगावला. तसेच धमकीच्या फोनबाबत सीआयडी चौकशी करावी, असेही ते म्हणाले.



महायुतीचे कार्यकर्ते - नेते एकत्र काम करणार...


जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी धूस पुस असते पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचा एक मॅग्नेट आम्हाला सर्वांना जोडलेला आहे. पण देशासाठी नरेंद्र मोदीच पाहिजेत या एकाच मतासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते तुम्हाला एकत्र काम करताना दिसतील, असा विश्वास आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केला.काँग्रेस पक्ष हा गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याची टीका राणे यांनी केली.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग