पर्यावरणाशी मैत्री

Share

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

पृथ्वी, अग्नी, आकाश, वायू, जल या पाच म्हणजे पंचमहाभूतांचे बनलेले आवरण म्हणजे पर्यावरण. अवतीभोवतीच्या वायू, भू, आकाश मंडल, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय आणि हे थांबवले पाहिजे, कारण यातूनच आपल्याला इजा पोहोचते. निसर्गाचा असमतोल होतो. जंगल लाकूडतोड, प्लास्टिकचा वापर, इलेक्ट्रिकचा वापर, इंजिने, उपकरणे, एसी, घरोघरी गाड्या त्यामुळे माणसं हॉर्न वाजवणे रस्त्यावर कचरा टाकणं यामुळे ध्वनी, वायू यांचे प्रदूषण होते. पाण्याचा अतिवापर किंवा नद्यांमध्ये जनावरे आणि गाड्या धुणे त्याचप्रमाणे दूषित पाणी नद्यांना सोडणे यामुळे पाणीटंचाईसुद्धा होते. रासायनिक कंपन्यांतून धूर सोडणे यामुळे ओझोनचा थर कमी झाला. बागबगीचे, झाडे, वारा, सावली, फळे, फुले, अन्नधान्य, ऑक्सिजन कमी झालं. सुखद गारवा पूर्वी असायचा, तो नष्ट झाला.

आता दोन वर्षांत कोरोनाच्या काळात गॅस सिलिंडर म्हणजे ऑक्सिजनची किंमत आपल्याला समजली. निसर्ग हाच खरा आपला गुरू. सत्य, समता, स्वातंत्र्य, आनंद, प्रेरणा, ऊर्जा, शक्ती, स्नेह, सहकार्य आणि कृतज्ञता इत्यादी त्याच्याकडून शिकावे. पर्यावरण जोपासना दिन डिसेंबरमध्ये सर्वत्र साजरा करण्यात आला. कौमी एकता सप्ताह १९ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्याच्या कालावधीमध्ये पर्यावरण जोपासना दिन हा देखील आवर्जून साजरा केला जातो. शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यामागील हेतू आहे पर्यावरणाचे रक्षण करणे.

निसर्ग आपला मित्र-सोबती आहे. आपण कुत्रा, मांजराला जीव लावतो, तसा झाडांनाही जीव लावला पाहिजे, कारण तेही आपल्याशी बोलतात, गप्पागोष्टी करतात. चिंता, ताण-तणावात बागेत फेरफटका मारल्यावर मूड चांगला फ्रेश होतो, एनर्जी मिळते. ऑक्सिजन मिळतो, उत्साह वाढीस लागतो. पण आपण त्या झाडांवर काय केले? कुऱ्हाड चालवून आपण त्याच्या बागेची होळी करतो. त्यापासून वस्त्र, कोळसा, लाकूड, जमिनींना लाकूड हे सगळं निर्माण करतो आणि ओढवून घेतो हे संकट. आपण परिधान करतो ते कापूससुद्धा झाडालाच येते म्हणून वस्त्र मिळतात. पाणी पावसाचं, नदीचं, विहिरीचं, तलावाचं, समुद्राचं हासुद्धा निसर्गाचा भाग. झाडं, पाणी, सूर्य, हवा, अन्नधान्य हे सर्व कधीच भेदभाव करत नाहीत. समतेने वागतात तसेच मानवता मूल्यसुद्धा जपतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने परमकर्तव्य समजून या पर्यावरणाचे जतन, संवर्धन, संतुलन राखले पाहिजे, तरच निसर्ग आपला समतोल ठेवेल. त्याला आपण सांभाळलं, तर तो आपल्याला सांभाळेल. त्याचा अवमान केला, तर पुन्हा आपल्याला परतफेड म्हणून तीच शिक्षा भोगावी लागेल.

समाज प्रबोधनासाठी प्रत्येक शाळेत ‘एक मूल एक झाड’ लावा. आपापल्या घरी-दारी, बाल्कनी, टेरेस, मैदान, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून मायेने त्यांचं संगोपन करा, वाढवा! एक रोपट कुंडीत लावले आणि लक्ष दिलं नाही काय होईल? सुकेल, कोमेजेल!! झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गाचे नंदनवन करा. इंद्रधनुष्य सप्तरंगी, पडून गेलेला पावसाळा, गर्द हिरवी वनराई, आकाशात दाटून आलेले ढग, एक पक्ष्यांचा किलबिल थवा, लाट, सुंदर रमणीय पहाट, धुकं, पहाटेचे दवबिंदू, मंजूळ कोकिळेचे सूर, शांत बागेतील प्रसन्न पहाट, योग प्राणायाम, भटकंती ऊर्जा हे निसर्ग आपल्याला देतो.

प्रसन्न पर्यावरण, हरितक्रांतीसाठी आपले कर्तव्य बजावून प्रयत्नशील होऊ व एक जबाबदार नागरिक बनू. उदाहरणार्थ आंब्याच्या सिझनला आंबे खाल्ले, तर त्या कोयी जपून ठेवा आणि आपल्या गावाला जाऊन आंब्याची लागवड करा. अशा पद्धतीने आपण जे पेरतोय ते उगवेल. दुसऱ्या पिढीला तिथून पुढच्या पिढीला तेच संक्रमित होईल. म्हणून वैचारिक, नैतिक, कौटुंबिक, सामाजिक, जबाबदारी म्हणून हा वारसा व वसा देण्याचे काम आपण करूया हीच आहे पर्यावरण जोपासना. पर्यावरण दिनी वृक्ष महोत्सव, वृक्षदिंडी, वृक्ष प्रदर्शन भरवून त्याचे महत्त्व वाढवूया आणि झाडे जगवू या.

Recent Posts

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

28 minutes ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

39 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

44 minutes ago

IPL 2025: शुभमन गिल लग्न करतोय? आयपीएलमध्ये प्रश्न विचारल्यावर गिल लाजला आणि म्हणाला…

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…

2 hours ago

Oppo K13 5G : अक्षय तृतीयेपूर्वीच ओप्पोने लाँच केला 7000mAh बॅटरी व AI फिचर असलेला नवा फोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…

2 hours ago