मुंबई: काळी मिरीमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे असतात. हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात.
हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांना काळ्या मिरीचा भरपूर फायदा होतो. काळ्या मिरीमध्ये पायपरीन नावाचे रसायन असते.
हे धमन्यांमधील रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यास मदत करते. यातील पोटॅशियम ब्लड प्रेशर कमी करण्याचे काम करते.
काळ्या मिरीचे सेवन तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी करू शकता.
सर्वात आधी १ ते २ काळी मिरी कुटून घ्या आणि गरम अथवा कोमट पाण्यासोबत काळ्या मिरीचे सेवन करा.
याच्या सेवनाने बीपी कंट्रोल राहण्यास मदत होते.