PM Narendra Modi in Nashik : भव्य रोड शो, काळाराम मंदिर, गोदावरीची आरती... कसा चालू आहे पंतप्रधानांचा नाशिक दौरा?

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यानिमित्ताने आज नाशिक शहरात दाखल झाले.


संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (Road Show) आतुरतेने वाट पाहत होते. सकाळी १०:३० वाजता त्याचे निलगिरी बाग येथे आगमन झाले. पंतप्रधान मोदी येताच जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसेच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आले. पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांच्या 'जय श्रीराम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. जनार्धन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला.



पंचवटीत प्रभू रामाचे दर्शन अन् रामकुंडावर जलपूजन


रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला भेट दिली. पुरोहित संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिककरांच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी यावेळी संकल्प करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.


यानंतर त्यांनी ऐतिहासिक काळाराम मंदिरात दर्शन घेतले. जवळपास २३ मिनिटे त्यांनी मंदिरात विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती केली. मोदींनी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश केला आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधान संकल्प केला करुन भावार्थ रामायणाचा पाठ केला आणि रामरक्षा पठण केले.



अतिरिक्त अडीच हजार पोलीस नाशकात दाखल


राज्यभरातून अतिरिक्त पोलीस नाशिकला दाखल झाले आहेत. यामध्ये १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास