
उदयपूरमधील रिसेप्शनचा व्हिडीओ आला समोर
उदयपूर : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Bollywood Actor Aamir Khan) याची लेक इरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचा विवाहसोहळा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. या जोडप्याच्या केळवणापासून, इराने मराठीत घेतलेला उखाणा ते लग्नात शॉर्ट्स आणि सॅण्डो घालून आलेला नुपूर अशा सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिल्या.
View this post on Instagram
दोघांनी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर काल, १० जानेवारी रोजी उदयपूरमध्ये मित्रमंडळी व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा रिसेप्शनसोहळा पार पडला. या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. दोघांचा आंतरधर्मीय विवाह आहे.
View this post on Instagram
लग्नात इराने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर, नुपूरने ग्रे कलरचा सूट आजच्या खास दिवसासाठी निवडला होता. पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांनी हातात हात घालून एंट्री घेतली. त्यांनी एंट्री घेतल्यावर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दोघांवर फुलांचा वर्षाव केला. दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. त्यांनी एकत्र डान्सही केला.