National Youth Festival : निलगिरी बाग मैदान ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो, त्यानंतर होणार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन

Share

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साधला प्रसार माध्यमांशी संवाद

नाशिक : नाशिक शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी (National Youth Festival) जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त तथा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिक शहरातील विविध भागात २२०० पेक्षा अधिक रूमची व्यवस्था केली आहे. निवासाच्या ठिकाणापासून कार्यक्रमाच्या स्थळांपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग मैदानात हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असून येथून ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत. नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेने युवा महोत्सवासाठी युद्ध पातळीवर तयारी केली आहे. तपोवन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, “देशातील विविध कोनाकोपऱ्यातून सुमारे ७ हजार ५०० युवक सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवात राज्यभरातून ३६०० युवक, २५०० स्वयंसेवक, ४०० आमंत्रित स्वयंसेवक आणि १००० युवक सहभागी होणार आहेत. कलेच्या सादरीकरणासह ५०० युवक आणि संशोधकांसाठी एक विशेष मंच दिला जाणार आहे. युवा महोत्सवासाठी १ लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

या महोत्सवात १२ ते १६ जानेवारी दरम्यान शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांस नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विभागीय आयुक्त गमे यांनी केले आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांशी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगानाने चर्चात्मक संवाद साधला.

मोदींच्या सभेसाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोम

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित डोमचा उपयोग नाशिकमध्ये पहिल्यांदाच करण्यात येत आहे. तब्बल २०० फूट उंच आणि ८०० लांबीचा वॉटरप्रूफ मुख्य डोम उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. विशेष म्हणजे संपूर्ण साउंड सिस्टिम ही नाशिकची राहणार आहे.

तपोवनातील मोदी मैदानावर शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‍घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. तपोवनातील १८ एकर मैदानावर ५० हजार लोकांची व्यवस्था करण्यात येत आहे. या मैदानावर मंडप, साउंड सिस्टिम व आसनव्यवस्थेची कामे प्रगतिपथावर आहेत.

त्यासाठी तब्बल ७०० कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. यापूर्वी भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी वापरात आलेल्या डोमची उंची ९० फूट होती, तर या डोमची उंची तब्बल २०० फूट आहे. गुरुवार (ता. ११) पर्यंत हे काम पूर्ण होईल.

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

3 hours ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

6 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

8 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

8 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

8 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

8 hours ago