Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीशेअर मार्केटमध्ये रिटर्नच्या नावाने महिलेने गमावले ३.८० कोटी रूपये, ४८ तासांत मुंबई...

शेअर मार्केटमध्ये रिटर्नच्या नावाने महिलेने गमावले ३.८० कोटी रूपये, ४८ तासांत मुंबई पोलिसांनी मिळवून दिले पैसे

मुंबई: मुंबईच्या सायबर क्राईम पोलिसांच्या(cyber crime police) हाती मोठे यश आले आहे. पोलिसांनी शेअर ट्रेडिंगच्या(share trading) माध्यमातून फसवणूक झालेल्या एका महिलेला तिचे पैसे परत मिळवून दिले. यासाठी पोलिसांनी सलग ४८ तास काम केले आणि आरोपीला अटक केली. आरोपीचे खाते फ्रीज करून पोलिसांनी त्या महिलेला पैसे परत केले.

महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली होती. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. असे करून आरोपीने महिलेचे ३.८० कोटी रूपये लुबाडले होते.जसे महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसे तिने हेल्पलाईन नंबर १९३०वर कॉल करून आपली तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला इन्स्टाग्राम स्क्रोल करत होती तेव्हा तिला शेअर मार्केटमध्ये ट्र्रेडिंगसाठी पैसे गुंतवणुकीबाबतची जाहिरात दिसली. महिलेने जसे त्यावर क्लिक केले तसे तिला दुसऱ्या प्रोफाईलवर रिडायरेक्ट करण्यात आले. येथे तिला शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न देण्याबाबतचे आमिष देण्यात आले. महिलेने एकूण मिळून ४.५६ कोटी रूपये गुंतवले होते. अॅपवर याचे रिटर्न्सही दाखवले जात होते. मात्र ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नव्हती. त्याचवेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पोलिसांच्या माहितीनुसारी आरोपींनी २६ बँकांमधील ७१ बँक खात्यातून १७१ वेळा देवाणघेवाण केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार अहमदाबाद, नवी मुंबई आणि दुबई येथून पैसे काढण्यात आले होते. पीडित महिलेने ४ ते ६ जानेवारीदरम्यान पैसे गुंतवले होते. तिला ७ जानेवारीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानतंर तिने १३९० या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -