भाईंदर : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार महापालिकेचे प्रत्येक वर्षी लेखा परिक्षण करणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो, असे असतानाही मीरा भाईंदर महापालिकेचे गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.
महापालिकेच्या आर्थिक कारभारावर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी, अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे दैनंदिन जमा खर्च पाहणे यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करणे अपेक्षित असते. परंतु गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याची तक्रार माजी नगरसेवक अजित पाटील यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लेखा परिक्षणासाठी महापालिकेने २०२० पासून निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची लेखापरिक्षक तथा लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अधिकाऱ्यांच्या पगारावर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असताना कोणत्याही प्रकारचे लेखा परिक्षण झालेले नाही. त्या अधिकाऱ्या कडून परीक्षण करून घेण्याची जबाबदारी मुख्य लेखा परिक्षक, लेखा परिक्षण विभाग यांची असताना त्यांनी आपल्या कामात कसूर केल्याचा आरोप अजित पाटील यांनी केला आहे. महापालिकेकडे जमा होणाऱ्या रक्कमांचे लेखा परिक्षण वेळच्या वेळी करणे आवश्यक असताना कोणतेही लेखा परिक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे जमा झालेल्या रक्कमा महापालिका फंडात जमा झाल्या किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
महापालिकेचे अंतर्गत लेखापरिक्षण वेळच्या वेळी करणे अनिवार्य असताना लेखा परिक्षणात विलंब तसेच दिरंगाई केली असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा पाटील यांनी करून याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नाही. कोरोना काळात लेखापरिक्षणाचे काम मागे पडले गेले, त्यानंतर या कामाची गती मंदावली होती. आता लेखापरिक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून चारही वर्षांचे लेखापरिक्षण ३१ मार्चपर्यंत पुर्ण होईल. – सुधीर नाकाडी, मुख्य लेखा परिक्षक
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…