T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा, ९ जूनला भारत-पाक सामना

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघ स्पर्धेत ग्रुप एमध्ये आहे. ग्रुप एमध्ये भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड आगे. तर या स्पर्धेतील पहिला सामना यूएसए आणि कॅनडा यांच्यात १ जूनला खेळवला जाणार आहे.


२०२४मध्ये टी-२० विश्वचषकातील एकूण ५५ सामने खेळवले जातील. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये ९ ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यात तीन अमेरिकन शहर न्यूयॉर्क सिटी, डलास आणि मियामी वर्ल्डकप सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे.


२०२४ टी-२० विश्वचषकाचा सेमीफायनल आणि फायनल सामना वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाईल. २६ जूनला पहिला सेमीफायनल सामना गयानामध्ये खेळवला जाईल. २७ जूनला दुसरा सेमीफायनल सामना त्रिनिदादमध्ये होणार आहे. स्पर्धेचा शेवटचा म्हणजेच फायनल सामना २९ जूनला बारबाडोसमध्ये खेळवला जाईल.


२०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपचा पहिला सामना कॅनडा आणि यूएसएमध्ये १ जूनला खेळवला जाईल. तर विश्वचषकातील फायनल सामना २९ जूनला रंगेल. स्पर्धेत १ ते १८ जून दरम्यान ग्रुप स्टेजचे सामने खेळवले जातील. यानतर १९ ते २४ जूनदरम्यान सुपर ८चे सामने रंगतील.


लीग स्टेजचे सामने - १ ते १८ जून


सुपर ८ मधील सामने - १९ ते २४ जून


सेमीफायनल सामना - २६ आणि २७ जून


फायनल सामना - २९ जून



२०२४मधील वर्ल्डकपचे लीग स्टेजमधील भारताचे सामने


५ जून - भारत वि आयर्लंड
९ जून - भारत वि पाकिस्तान
१२ जून - भारत वि अमेरिका
१५ जून - भारत वि कॅनडा

Comments
Add Comment

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस