Sukesh-Jacqueline : साळसूदपणाचा आव आणणा-या जॅकलीनसोबतचे प्रायव्हेट चॅट सुकेशने लिक केले!

मुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez) ही आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. दोनशे कोटींच्या मनी लॉड्रिंग केसप्रकरणी अटकेत असलेला तिचा कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याने लिक केलेल्या प्रायव्हेट चॅट मुळे जॅकलीनविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.


सुकेश हा सध्या तिहार जेलमध्ये आहे. त्याने जेलमधून जॅकलीनला प्रेमपत्र पाठवले. मात्र मी नाही त्यातली अशी भूमिका जॅकलीनने घेतल्याने सुकेशने जॅकलीनसोबतचे प्रायव्हेट व्हाट्स अप चॅट लिक केल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामध्ये जॅकलीनने त्याला आय लव यू म्हटले असून त्याच्या प्रती आपले प्रेम व्यक्त केले आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये त्यांच्यातील रिलेशनशिपविषयीच्या बातम्यांना उधाण आले होते. सुकेश त्यावेळी मनी लॉड्रींग प्रकरणी पोलिसांच्या तपासाचा महत्वाचा विषय होता. आता सुकेश आणि जॅकलीनच्या व्हाट्सअपचे चॅटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्याने जॅकलीनला प्रपोझ केले आहे. यापूर्वी जॅकलीनने आपल्याला सुकेशपासून धोका असल्याचे म्हटले होते.


जॅकलीनने जेव्हा कोर्टाकडे याप्रकरणी तक्रार केली होती तेव्हा सुकेशचे वकील यांनी त्या दोघांचे पर्सनल चॅट समोर ठेवले होते. त्यामध्ये सुकेशने म्हटले होते की, जॅकलीन मला खूप वाईट वाटते पण तू आता माझ्यापुढे कोणताही पर्याय सोडलेला नाही. त्यामुळे मला हे कृत्य करावे लागत आहे. जमल्यास मला माफ कर.. तू जे काही केले त्याविषयी मी कुणालाही काही बोललो नाही. पण तू मात्र माझ्याविषयी खूप काही सांगितले. माझ्या पाठीत तू खंजीर खुपसलेस, मला वाटतं प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आता सगळ्या जगाला कळू देत की, आपलं प्रेम काय होतं ते.. अशा शब्दांत सुकेशने त्या चॅटमध्ये जॅकलीनसाठी खास मेसेज लिहिला आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व