Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाSA vs IND: सचिन तेंडुलकरकडून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक

SA vs IND: सचिन तेंडुलकरकडून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक

मुंबई: भारतीय संघाने केपटाऊनमधील कसोटीत दक्षिण आफ्रिकेला(south africa) ७ विकेटनी हरवले. या तऱ्हेने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. तर सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यांमध्ये एखाद्या आशियाई संघाने पहिल्यांदा हरवले. भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना बाद केले.

टीम इंडियाच्या या शानदार विजयावर माजी दिग्गज सचिन तेंडुलकरने भाष्य केले आहे. सोबतच त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे जोरदार कौतुक केले आहे.

एडन मार्करमने कमाल फलंदाजी केली मात्र जसप्रीत बुमराह…

भारतीय संघाच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने एक्सवर पोस्ट करत म्हटले, टीम इंडियाने मालिकेत बरोबरी साधल्याचे अभिनंदन. मात्र एडन मार्करमने कमालीची फलंदाजी केली कारण अनेकदा पिचवर आक्रमक अंदाजात खेळणे हा सर्वात चांगला पर्याय असतो. जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने दाखवून दिले की अशा प्रकारच्या विकेटवर कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे.

अशी झाली केपटाऊन कसोटी

टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ५५ धावांवर आटोपला. भारतासाठी मोहम्मद सिराजने ६ विकेट मिळवल्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. या पद्धतीने टीम इंडियाला ९८ धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर संपला. यावेळेस जसप्रीत बुमराहने ६ विकेट मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -