Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीGautam Adani : गौतम अदानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : गौतम अदानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

संपत्तीत इतकी वाढ की अंबानींनाही टाकलं मागे

मुंबई : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत तब्बल ७.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याने ते भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest person in India and Asia) बनले आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागे टाकले आहे. अदानींमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अंबानी थेट १२ वरुन १३व्या स्थानावर गेले आहेत तर आता अदानींनी बारावे स्थान मिळवले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, गुरुवारपर्यंत अदानी अब्जाधीशांच्या यादीत १४व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांनी केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्यांच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ते आता १४व्या स्थानावरून १२व्या स्थानावर पोहोचले आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. मुकेश अंबानींची संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या २४ तासांत त्याची एकूण संपत्ती ६६५ दशलक्षने वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -